Skip to main content

Posts

नियती आणि प्रयत्न - १९८७ हैदराबाद प्रोजेक्ट आणि विलास भावे

नियती आणि प्रयत्न - १९८७ हैदराबाद प्रोजेक्ट आणि विलास भावे १९८७ साल मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही. व्यवसाय सुरु करून ३ वर्षे झाली होती. मी ऐन तिशीत होतो. जयदीप शहांच्या कंपनीकडून एक कंट्रोल पॅनेलची ऑर्डर मिळाली. त्याचे झाले असे की हैदराबादला एक कंपनी होती तिचे नाव बेकेलाईट हायलेम. ही कंपनी लॅमिनेट आणि इंशुलेटर्स बनवत असे. ज्याला आपण सनमायका वा फॉरमायका असे संबोधतो त्याला तांत्रिक भाषेत लॅमिनेट म्हणतात. हे लॅमिनेट कपाटे टेबल इत्यादी फर्निचरच्या सरफेसवर चिकटवतात. कमर्शियल लॅमिनेट बनवण्यासाठी कागद फॉरर्माल्डीहाईड नावाच्या केमिकल मध्ये बुडवून त्याचे ८-१० स्तर आणि त्यावर डिझाईन असलेला पेपर लाऊन एका हायड्रोलिक प्रेसमध्ये १५०c डिग्री तापमानाला १६०० टन एव्हडा दाब देऊन बनवला जातो. याच लॅमिनेटला एका किंवा दोन्ही बाजूने तांब्याचे शीट लाऊन इलेक्ट्रोनिक्समध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रिंटेड सर्किट बोर्डसाठी लागणारे कॉपर क्लॅड बनवतात. बेकेलाईट हायलेम या कंपनीने जर्मनी वरून एक १६०० टन दाब देऊ शकणारा प्रेस खरेदी केला होता. या प्रेस मधून लॅमिनेट बनवण्यासाठी material handling system माझे मित्र श्री जयदीप…
Recent posts

मेणबत्त्या जळत राहतील

कळ्या कोमेजतील
लेकी जळत रहातील
पणत्या विझून जातील
मेणबत्या पेटत राहतील
मने मात्र थंड राहतील
व्यवस्था निद्रिस्थावस्थेत
8व्या वेतन आयोगाची
स्वप्ने बघतील
मानवाधिकार असे
फक्त नराधमांना
आक्रंदन करतील
पुरोगामी उर बडवून
त्यांच्या साठी
उठवा न्याय व्यवस्थेला
रात्री नराधमांना
न्याय हवा आहे
जामीन हवा आहे
या अवेळी
तिच्यासाठी ते उठणार नाहीत
त्यांची उन्हाळी पावसाळी
आणि हिवाळी सुट्टी चालू असते

कळ्या कोमेजतील
लेकी जळत रहातील
पणत्या विझून जातील
मेणबत्या पेटत राहतील
नका उठवू व्यवस्थेला
तिच्या साठी
ती उठते रात्री फक्त
नराधमांना जामीन द्यायला.

श्रीकांत कुलकर्णी
9850035037

कळ्या जळत राहतील मेणबत्त्या पेटत राहतील

आरोपीही दोषी,
न्याय व्यवस्था ही दोषी
पोलीस देखील दोषी
सरकार देखील दोषी
बाकी काही नाही

हकनाक प्राण तिने गमावला
त्या हैदराबादच्या लेकीने
कसला न्याय देणार तिला
जी जगातच उरली नाही
बाकी काही नाही

कसला जल्लोष करता राव
तिकडे उन्नावच्या लेकीने दम तोडला
आज दुःख करायचे
उद्या तिच्या मारेकऱ्यांचा
एन्काऊंटर केला की
पुन्हा पेढे वाटायचे
फुले उधळायची
बस बाकी काही नाही

पुन्हा जल्लोष करायचा
आणि अजून एका लेकीच्या
ब…

ते निरागस आहेत हो.

ते निरागस आहेत हो

अहो हिंदुत्व तुमच्या मनात
तुमच्या समाधानासाठी हिंदुत्ववादी होतात
खरं म्हणजे ते अगदी निरागस निर्मळ असतात

अहो राम रहीम झिजस भेद तुमच्या मनात
तुमच्या समाधानासाठी मंदिर मस्जित वाद
खरं म्हणजे ते अगदी निरागस निर्मळ

अहो धर्मनिरपेक्षात तुमच्या मनात
तुमच्या समाधानासाठी धर्मनिरपेक्ष होतात
खरं म्हणजे ते अगदी निरागस निर्मळ  असतात

अहो धर्मद्वेष तुमच्या मनात
तुमच्या समाधानासाठी धर्म द्वेष वाढवतात
खरं म्हणजे ते अगदी निरागस निर्मळ असतात

अहो जाती द्वेष तुमच्या मनात
तुमच्या समाधानासाठी ते जातीची समीकरणे करतात
खरं म्हणजे ते अगदी निरागस निर्मळ असतात

अहो राजकीय मित्रत्व शत्रुत्व तुमच्या मनात
ते अजातशत्रू असतात अजातमित्र असतात
खरं म्हणजे ते अगदी निरागस निर्मळ असतात

सगळे वाद तुमच्या मनात
तुमच्या समाधानासाठी ते तुमच्या वादात पडतात
खरं म्हणजे ते अगदी निरागस निर्मळ असतात

तुमच्या मनात त्यांच्याविषयी अतीव प्रेम असते
तुमच्या समाधानासाठी ते तुमच्यावर प्रेम करतात
खरं म्हणजे ते अगदी निरागस निर्मळ असतात.

तर मंडळी तुम्ही तुमचे शत्रुत्व धरून बसता
ते मात्र एका रात्रीत एकमेकांना आलिंगन देतात
खरं म्हणजे…

बोअर मार्गदर्शन

सेनाप्रमुख किती सारखं सारखं मार्गदर्शन करतात.  सकाळ संध्याकाळ आपलं चालूच.
गेले महिनाभर या हॉटेलात नेऊन त्या हॉटेलात नेऊन.  बरं ते बोलणं पण ओघवते नाही.
तेच ते रटाळ. तेच रटाळ.
वडिलांचे कौतुक, पवारांचे कौतुक, कसं वागायला हवंय,
शिवरायांचा अभिमान, या मातीचा अभिमान, मराठीचा अभिमान, खोटारडे, मुंबई आमचीच, आमचा शेतकरी, आमच्या मातोश्री, आमचा आदित्य आमचा सैनिक किती किती ऐकवतात.
आपण तर नसतं बुवा ऐकून घेतलं.
एक दिवस आमदारांना या मार्गदर्शनाचा कंटाळा येऊन भाजपला मिळतील.
काय सांगावे. अजितदादा नाही चर्चेला कंटाळून उपमुख्यमंत्री झाले.
मी आपला धोका सांगितला. नंतर म्हणू नका आधी का सांगितले नाही म्हणून.
खरं सांगू का इतका मार्गदर्शनाचा ओव्हर डोस झालाय त्यांना आता विपश्यनेची गरज आहे.

श्रीकांत कुलकर्णी

महावस्त्रहरण

महावस्त्रहरण – एक राजकीय महा-नाट्य
शेवटी राष्ट्रपती राजवट लागू होऊन महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्याचा मध्यंतर होऊन पडदा पडला. निवडणूकीचे निकाल लागल्यापासून हे नाटक सुरु झाले. खरं म्हणजे हे नाटक रंगमंचावर आलेच नाही. मतदारांनी नाटकाचे स्किट नीट न लिहिल्याने नट मंडळी स्वतः मनाला येईल ते डायलॉग बडबडू लागली. नाटक रंगमंचाऐवजी विंगेतच सुरु झाले  आणि पडदे मात्र सताड उघडे राहिले. नटमंडळीचे विंगेत कोणी कोणते कपडे घालायचे हे ठरत नव्हते. कपडेपटावरून नट मंडळींची जुंपली. एकमेकांच्या अंगावरचे मूळ कपडे तर सगळ्यांनी आधीच उतरवून ठेवेले होते आणि मतदारांनी ठरवलेल्या स्क्रिप्टनुसार कपडे घालायचे इतकंच काय ते बाकी होते. मतदारांनी लिहिलेल्या स्क्रिप्टनुसार मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि त्यामुळे महावस्त्रे  भाजपकडे यायला हवी होती. शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे आयत्यावेळी लपवून ठेवले असल्याने भरपावसात भाजप कमरेचे कसेबसे सांभाळून ‘माझे कपडे माझे कपडे’ असे संयमित आवाजात ओरडत होता. पण शिवसेना मात्र पूर्णपणे दिगंबर अवस्थेत होती त्यांना अंतर्वस्त्र देखील मुख्यमंत्री पदाचीच हवी होती. त्यामुळे ती देखील त्यांन…

कर्माचे भोग की करमणूक

कर्माचे भोग की करमणूक
निवडणुकीचे गांभीर्य मतदान झाले की संपते मग उरते ती करमणूक आणि हतबलता. याचे प्रत्यंतर प्रत्येक निवडणुकी दरम्यान आपल्याला येते. गेले महिनाभर महाराष्ट्रात जो गोंधळ चालू आहे त्याची सुरवातीला करमणूक वाटली आणि आता शिसारी येऊ लागलीय. ज्या पद्धतीने मतदारांनी दान टाकले त्याची सुरवात युत्या आणि आघाडीने सुरु झाली. जागा वाटपातच ठरले होते की कोणा एका पक्षास बहुमत मिळणार नाही. भाजप सगळ्यात जास्त जागा लढवणारा पक्ष त्यानेच फक्त १५० जागा लढवल्या. कितीही लोकप्रियता असली तर १५० पैकी १४५ ही अशक्यप्राय गोष्ट होती बाकी पक्षांच्या लढवलेल्या जागा त्या पेक्षाही कमी होत्या. त्यामुळे एक पक्षीय सरकार येऊच शकणार नाही हे आधीच पक्के झाले होते. लोकांना युती वा आघाडी बघून मत देण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्या विचारांशी योग्य पक्ष तो नसेल तर त्याच्याशी सलग्न पक्ष यांना मतदान करून मतदारांनी आपला हक्क जबाबदारीने निभावला असेच म्हणावे लागेल. कारण त्यांनी एका युतीला बहुमत दिले त्याचं बरोबर विरोधी आघाडी देखील तुल्यबळ ठेऊन सत्ताधारी पक्षावर वचक राहील याची सोय केली. खरे बघता या निवडणुकीत मतदार सर्वात जास…

आहेर, गिफ्ट, प्रेझेंट आणि बरेच काही

आहेर, गिफ्ट, प्रेझेंट आणि बरेच काही घरी निमंत्रण पत्रिका आली “अहो, आहेर काय करायचा?” असा मौलिक प्रश्न प्रत्येक बाई नवऱ्याला विचारतेच. सहसा नवरे या प्रश्नाचा गंभीरपणे विचार करत नाहीत. कारण त्याला माहित असते त्याच्या सूचनेला काहीही किंमत नसते. शेवटी ती गृहलक्ष्मी तिला करायचा तोच आहेर करणार. निमंत्रणपत्रिका आली की त्याला एकच प्रश्न पडतो तो म्हणजे कार्याला हजर राहायला साहेबाला काय सबब द्यायची? साहेब रजा देईल का नाही? का काय कारण सांगून दांडी मारायची? का अक्षता टाकून पहिल्या जेवण पंगतीत उरकून काम गाठायचे का अर्धा दिवस दांडी मारायची? बहुतेक नवरे “आहेर काय करायचा?” हा प्रश्न समोरून आला की सहसा “करुयात की काहीतरी. आहे काय त्यात एव्हडे?” हा प्रश्न मुखातून न काढता केवळ चेहऱ्यावर भाव आणून दाखवतात आणि तिथेच गडबड होते. आपला नवरा आहेर हा विषय गंभीरपणे घेत नाही म्हटल्यावर बाई चिडतात. जरबेने विचारतात. “हे बघा आहेराचा विचार आत्तापासून करायला हवा. तुम्ही कॅज्युअली घेऊ नका. माझ्या बरोबर थोडा वेळ काढा. कोणतीही सबब ऐकून घेणार नाही. मागच्या वेळी सुलूताईच्या मुलीच्या लग्नात आपण २००० रुपयांची साडी आहेरात दिली…